
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
आष्टी दि. १ ऑगस्ट : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आष्टी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बैठकीत आष्टी परिसरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नांची माहिती जाणून घेत पक्ष संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच बूथ सशक्तीकरण, जनसंपर्क वाढविणे आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत ग्रामपंचायत आष्टीच्या सरपंचा बेबीताई बुरांडे तसेच ग्रामपंचायत मार्कंडा (कं.)च्या सरपंचा वनश्रीताई चापले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या दोन्ही महिला सरपंचांचे स्वागत करत, “भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी कटिबद्ध असून, वाढता जनविश्वास हीच पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे,” असे प्रतिपादन केले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, अविनाशजी विश्रोजवार, भाजयुमो जिल्हा महामंत्री पवन रामगिरकार, नरेश अलसावार, अनंतजी प्रधान, रवीजी आलचेट्टीवार, देवाजी बोरकुटे, संदीप तिवाडे, विनोद भोयर, राजनाथजी कुशवाह, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर,कपिल मसराम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

