
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
गडचिरोली :-
गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते श्री. अमोल दिगांबर करंबे यांचे द्वारे लिखित आणि दिग्दर्शित “अरण्य” या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. अरण्य हा चित्रपट गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील माओवादी चळवळीची दहशत कशी असते वास्तविकता ,अतिसंवेदनशील भागातील आदिवासी समाजातील जनसामान्यांचे जिवन एका माओवादी पात्राचे माओवादी चळवळीतील आयुष्य आणि आत्मसमर्पणानंतरचे आयुष्य या परिवर्तनाच्या कथेवर वास्तविकत जीवनाचा वेध, पोलीस प्रशासन व नक्षलवादी यांच्या प्रत्यक्ष कार्यविमांनषेला आधारित आहे.
सदर पोस्टर अनावरण प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) . एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), गडचिरोली गोकुल राज जी., लेखक–निर्माते अमोल दिगांबर करंबे हे उपस्थितीत होते. शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अभिनेते हार्दिक जोशी, हृतिका पाटील, चेतन चावडा, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
19 सप्टेंबर रोजी राज्यभरात सदर चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.


