
- न्यूज जागर..
मूल, प्रतिनिधी :
शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्य, डोंगरगाव तथा इंटक मूल तालुका अध्यक्ष श्री किरण भाऊ पोरड्डीवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंगरगाव व रत्नापूर येथील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नोटबुक, कंपास, पेन्सिल व शालेय बॅग यांचे वितरण करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी किरण भाऊ पोरड्डीवार यांच्या सामाजिक बांधिलकीचे व शिक्षणाप्रती असलेल्या योगदानाचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
न्यूज जागर…..

