
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.१० जूलै:
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी शुक्रवारी (दि. १० जुलै) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संघटनात्मक कामकाज, सामाजिक प्रश्न तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली.

भेटीदरम्यान डॉ. अशोक नेते यांनी जमाल सिद्दीकी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व गडचिरोली दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेत अल्पसंख्यांक समाजासमोरील विविध समस्या, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मंथन करण्यात आले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, नगर परिषद बांधकाम सभापती तथा भाजप शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, नगर परिषद महिला व बालकल्याण सभापती तथा शहराध्यक्ष सिमाताई कन्नमवार, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलीम शेख, नगरसेविका तथा जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, नगरसेविका शिल्पा गव्हारे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, मनमोहन बंडावार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

