
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आरमोरी,दि.२६ जून:आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सुरू असलेल्या रस्ते विकास कामांची सद्यस्थिती, नवीन रस्त्यांचे प्रस्ताव तसेच दुरुस्ती आवश्यक असलेल्या रस्त्यांबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत विविध रस्ते विकास कामांचा आढावा घेऊन कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना आ.रामदास मसराम यांनी दिल्या . तसेच नवीन प्रस्तावित रस्त्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी धनपाल मिसार ,कमलेश बारस्कर,सागर वाढई,कार्यकारी अभियंता सरदार साहेब, उपअभियंता (कुरखेडा) मडावी , कनिष्ठ अभियंता वनमाळी फुले, मडावी, कु. मडावी, कु. नाकाडे, मेश्राम उपस्थित होते.

