
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथील तरुणाचा वीज पडून मृत्यू होण्याची घटना आज सोमवार दि.८ जून रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास घडली.
नितीन डुडुरे वय ३५ वर्ष असे या तरुणाचे नाव असून तो शेतामध्ये काम करत असताना अचानक आभाळ दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान वीज पडून त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे
#newsjagar

