
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दि.१ मे :
गडचिरोली येथील भाजपा चे जिल्हा महामंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र सिनेट सदस्य, रा.तु.म.नागपूर विध्यापीठ. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश महासचिव, जनजाती चेतना परीषदेचे प्रांत संयोजक प्रकाश गेडाम यांना दिल्ली येथे डॉक्टरेट अवार्ड देउन सन्मानित करण्यात आले.
आदिवासी समाजात भरीव कार्य,कचारगड यात्रे करीता येणा-या भाविकांना 20 वर्षा पासून मोफत अन्न,शौचालय, निवास,आंघोळ व्यवस्था,आदिवासी विध्यार्थी संघ,आदिवासी विकास परीषद,आँल ईंडीया ऐम्प्लाईज फेडरेशन, आदिवासी गोटुल समीती,जनजाती चेतना परीषद या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजा करीता भरीव कार्य, भगवान बिरसा मुंडा,विर बाबुराव शेडमाके यांचे सह 6 पुस्तकाचे लिखाण केले आहे.

या सर्व समाजसेवी कार्याची दखल घेत सोशल वर्क करीता साउथवेस्ट्रर्न अमेरिकन विध्यापीठाने डॉक्टरेट अवार्ड दिल्ली येथे ऐका भव्या कार्यक्रम दिला आहे.

