
नितेश गट्टीवार न्यूज जागर,गडचिरोली दि.२४ मे:
गणेश नगर, चामोर्शी येथील संतोष जुवारे हा युवक अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वाईस ऑफ मीडियाचे सुधीर गडपायले यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्य सुरू केले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. मा. पोनि दीपक डोंब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली (API )बनसोडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक कोसनसिले साहेब तसेच पोलीस कर्मचारी चिडे, झाडे, पिपरे, तरंगे यांनी तत्परतेने मदतकार्य राबवून संतोष जुवारे यांना विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले.

वेळीच मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिक नागरिकांकडून पोलिस प्रशासन व सुधीर गडपायले यांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.

