
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दि.२४ मे:
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी नियुक्ती झाल्यानंतर प्रथम यांनी मार्कंडा देवस्थान येथे भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले. व गडचिरोली जिल्ह्याच्या विकास, शांतता आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज भाऊ गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी व नगरसेवक सुमेध तुरे उपस्थित होते.


