Action against illegal liquor sellers in Korchi

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली

निर्मल धमगाये यांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार; पोलिसांचा कडक इशारा
कोरची

गडचिरोली जिल्हा १९९२ पासून दारूबंदी जिल्हा म्हणून घोषित असतानाही कोरची तालुक्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीचे प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
कोरची येथील दारू विक्रेता निर्मल अंकालू धमगाये Nirmal Ankalu Dhamgaye हा पोलिसांच्या नेहमीच नजरेत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्रीसंदर्भात अनेक गुन्हे दाखल असून, यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतरही अवैध दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
Action against illegal liquor sellers in Korchi
अवैध दारू विक्रीसाठी लगतच्या जिल्ह्यातून तसेच राज्याबाहेरून दारूची वाहतूक करून किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा केल्याने परिसरातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कुरखेडा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६(१)(अ) व (ब) अन्वये निर्मल धमगाये यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या महसुली सीमाबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरची पोलिसांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात यापुढे अधिक तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत अवैध दारू विक्री व वाहतुकीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुलराज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

