नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/देसाईगंज, दि. १९ मे २०२६ :
देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्या., देसाईगंज अंतर्गत किन्हाळा येथील धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
कार्यक्रमात आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत धान्य खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच वेळेत धान्य खरेदी करून योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्रजी बुल्ले, धनपालजी मिसार सर, माजी उपसभापती नितीनजी राऊत, व्यवस्थापक अण्णाजी तुपट मॅनेजर पुंडलिक तलमले, प्रथम क्रमांक शेतकरी मारोती पडोळे, घनश्यामजी टिकले, फाल्गुन टिकले, आबाजी राऊत, सुरेश धोटे, किसन कुंबरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी धान्य खरेदी केंद्र सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आ.रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत धान्य खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच वेळेत धान्य खरेदी करून योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्रजी बुल्ले, धनपालजी मिसार सर, माजी उपसभापती नितीनजी राऊत, व्यवस्थापक अण्णाजी तुपट मॅनेजर पुंडलिक तलमले, प्रथम क्रमांक शेतकरी मारोती पडोळे, घनश्यामजी टिकले, फाल्गुन टिकले, आबाजी राऊत, सुरेश धोटे, किसन कुंबरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी धान्य खरेदी केंद्र सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.