
सोनू वाळके, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
गडचिरोली :- गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ नामदेव किरसान यांनी जिल्ह्याच्या समस्या घेऊन केंद्रीय सडक परिवहन मंत्री मा नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन प्रलंबित जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याबाबद चर्चा केली.
नई दिल्ली येथील संसदेतील कार्यालयात लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सडक परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन गडचिरोली-चिमुर लोकसभेतील प्रलंबित राष्ट्रीय महामार्गसंदर्भात चर्चा केली व नागभीड ते उमरेड, देवरी ते कोरची-कुरखेडा-वडसा ते आरमोरी ते गडचिरोली तसेच आष्टी ते आलापल्ली, अहेरी ते सिरोंचा या महामार्गांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मागणी केली. तसेच कोरची रोड वरील पुराडा ते झनकारगोंदी या 12 कि. मी. घाटातील महामार्गाचे साईड सोल्डर काँक्रेटीकारण, पक्की गटारे व संवरक्षण भिंत करण्याची मागणी जिल्ह्याचे खासदार डॉ नामदेव किरसान यांनी केली असून प्रश्न लवकरात लवकर सुटेल अशे आश्वासन मा नितीन गडकरी यांनी दिले.


