
नितेश गट्टीवार गडचिरोली /चामोर्शी:
चामोर्शी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा शंकरपूर हेटी येथे सार्वजनिक अंबाबारूला मातेच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त दि.१९ते २३ तारखेपर्यंत पाच दिवसीय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पाच दिवसीय भागवत सप्ताहाचे प्रवचनकार ह.भ.प शंकरराव बुद्धाजी बारसागडे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम करण्यात येणार आहे. या पाच दिवसीय भागवत सप्ताह कार्यक्रमामुळे शंकरपूर हेटी या गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

सदर पाच दिवसीय भागवत सप्ताह कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनीही उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गाववासीयांकडून केल्या जात आहे.

