
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची अमरावती जिल्ह्यातील (चिखलदरा) येथून १३ एप्रिलपासून आदिवासी जनसंवाद यात्रेची सुरुवात; नागपुरात पूर्वतयारी बैठक संपन्न
नितेश गट्टीवार
नागपूर/गडचिरोली दि.१३ एप्रिल :

भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आगामी आदिवासी जनसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नागपूर येथील रवी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत डॉ. देवराव होळी यांनी यात्रेचे उद्दिष्ट, नियोजन व संघटनात्मक बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाच्या विविध समस्या, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविणे या दृष्टीने ही यात्रा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दि. 13 एप्रिल पासून या यात्रेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथून होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.तसेच, प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर मजबूत नियोजन करून यात्रेचे यश सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत यात्रेसाठी सक्रिय भूमिका निभावण्याची तयारी दर्शवली.
या बैठकीस आकाश मडावी (नागपूर शहर अध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा),रोहित कुमरे (महामंत्री),ललित मडावी (महामंत्री),अनिकेत कुमरे (महामंत्री ) ,सागर इवनाते (उपाध्यक्ष) ,यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

