
अभ्यासासाठी हक्काची जागा मिळावी, याच हेतूने या अभ्यासिकेची निर्मिती -आ.डॉ.मिलिंद नरोटे
नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.२६ मार्च :
चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथे आधुनिक अभ्यासिकेच्या बांधकामाचे आ.डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना आ.डॉ.नरोटे म्हणाले की,केवळ पोलीस भरती किंवा ठराविक क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता, आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन विविध आधुनिक इंडस्ट्रीज (Industries) आणि जागतिक स्तरावर संधी शोधायला हव्यात. अभ्यासासाठी हक्काची जागा मिळावी, याच हेतूने या अभ्यासिकेची निर्मिती करण्यात येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच आपल्या तरुणांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःची प्रगती साधावी आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. या आधुनिक ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह इतरही उच्च शिक्षणासाठी पूरक वातावरण उपलब्ध होईल.
पवित्र श्रीराम नवमीच्या दिवशी शिक्षणाचे हे दालन उभे करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत आ.डॉ.नरोटे यांनी केले.
यावेळी भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षअनिल पोहनकर, सेवानिवृत्त न्यायाधीश सुनिल दीक्षित, सोपान नैताम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेश अलसावार, निरज रामानुजनवार, अनिता रॉय, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्तेआणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

