
नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.२६ मार्च:
आरमोरी तालुक्यातील मानापुर येथे रामकथा, भक्ती सत्संग,भागवत सप्ताह आणि गोपाळकाला निमित्त भव्य धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी आ.रामदास मसराम यांची उपस्थिती होती.
मंडळाच्या वतीने आमदार रामदास मसराम यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आ.रामदास मसराम यांनी भाविकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला भोलू सोमणानी, शीतलताई भोलू सोमनाणी,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, नगरसेवक आरमोरी तथा गटनेता माणिक भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य आळे , माजी उपसभापती काशीकर, रत्नाकर सावकार धाईत, प्रकाश लेनगुरे, रेमाचंद निकुरे, शंकर बोरकर, वामन नाकाडे , भेंडारकर आदि उपस्थित होते उपस्थित होते.
कीर्तन, प्रवचन, भजन आणि सत्संगामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले.

