
नितेश गट्टीवार
गडचिरोली (चामोर्शी)दि.२६ मार्च:
रामनवमी निमित्त आज आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी चामोर्शीतील तेलंग मोहल्ला माता मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. उत्सवाच्या या मंगलमयी वातावरणात सहभागी होता आले, याचा आनंद व्यक्त केला.

यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नरेश अलसावार, निरज रामानुजनवार, सोपान नैताम उपस्थित होते.

