
नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. 20 मार्च :
गॅस दरवाढीच्या निषेधार्थ एनएसयुआय गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

एनएसयुआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सरकारने दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच गॅसचा योग्य व सुरळीत पुरवठा करण्यात यावा,असा इशारा देण्यात आला आहे.

