
देवाभाऊ धाव रे… आम्हा पाव रे ; जिल्ह्यात सुरक्षित कोण आहे दाव रे?
जिल्ह्यातील विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी’१०८ हनुमान चालीसाचे पठण’ पत्रकार परिषदेत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची माहिती
नितेश गट्टीवार, गडचिरोली:दि.१८ मार्च

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुलतानां संकटांना सामोरे जावे लागत आहे, मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात अनेक समस्या अजूनही भेडसावत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचे याकडे पूर्णता दुर्लक्ष असून, जिल्ह्यातील जनतेला अनेक समस्यांना सहन करावा लागत आहे या सर्व समस्या तातडीने निराकरण होऊन जिल्ह्यावर आलेले सुलतानी संकट संपुष्टात यावे, तसेच नागरिकांना सुरक्षित जीवन मिळावे, यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 24 मार्च 2026, दुपारी 12.30 वाजता, सेेमाना देवस्थान, गडचिरोली येथे भव्य १०८ हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे सह नगरसेवक तथा शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, ऍड. दुष्यंत नामदेव किरसान, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत तालुकाध्यक्ष चामोर्शी , नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेविका मेघाताई वरगंटीवार, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे, जिल्हाध्यक्ष अनु जाती विभाग रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, दिवाकर निसार,ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, जितू मुनघाटे,स्वप्निल बेहेरे, हेमंत मोहितकर, निकेश कामिडवार, मोहन वरगंटीवार, विपुल येलटीवर, कविताताई उराडे, मीनलताई चिमुरकर, शालिनीताई पेंदाम, शितलताई ठवरे,सह इतर उपस्थित होते.
दिवसेंदिवस जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे; अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्या,
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे,
शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक रानटी हत्ती व इतर वन्य प्राण्यांकडून पूर्णतः उद्ध्वस्त केले जात आहे, त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,
जिल्ह्यातील रस्त्यांची व आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे, पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची व आरोग्यवस्थेची दुरुस्ती करण्यात यावी. आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावे.
लोकांच्या हाताला पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे, स्थानिक सुरजागड कोणसारी प्रकल्पात व इतरर कोणत्याही नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना 80% जागा देण्यात याव्या,
जिल्ह्यातील बहुसंख्य दवाखाने, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून त्यामुळे जनतेच्या अनेक समस्या प्रलंबित असतात सदर रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी,
लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळत नाही, नियमित वीज पुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे वनपट्ट्यांचे दावे प्रलंबित असून तातडीने ते निकाली काढण्यात यावे,शालेय विद्यार्थ्यांकरिता व सामान्य नागरिकांकरीता अतिरिक्त बसेस वाढविण्यातयाव्या.जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावे,आदि समस्या दूर व्हावे, या करीता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक व काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, या माध्यमातून जिल्ह्यात उद्भवलेल्या गंभीर समस्यांतून मुक्तता मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

