
नितेश गट्टीवार /गडचिरोली:दि.१८ मार्च
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात डॉ. होळी यांनी मंत्री उईके यांच्यासमोर विविध मुद्दे मांडले.

मंत्री उईके यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, शहर उपाध्यक्ष श्याम सलामे तसेच सचिन भोयर आदी उपस्थित होते.

