
नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी):दि.१७मार्च
तालुक्यातील मार्कंडादेव येथे भारतीय जनता पार्टी चामोर्शी मंडळ आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.पुढे बोलताना माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की,सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजनांची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांचा समावेश आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारण्यास मदत होत आहे .

सरकारने ग्रामीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना लाभ होत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे , माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महामंत्री सदानंद कुथे, उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आनंद खंजाजी. आदी बहुसंखेने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.

