
नितेश गट्टीवार ,गडचिरोली :दि.१८ मार्च
भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान झालेल्या या भेटीत माजी आमदार डॉ. होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था तसेच आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर त्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी सूरज मडावी, श्याम सलामे आणि सचिन भोयर उपस्थित होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन पातळीवर ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

