
नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. १७ मार्च :
देशभरात वाढत्या गॅस दरामुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार व विद्यार्थ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडत असताना, एनएसयुआय ने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनएसयुआयच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येणार असून, “नरेंद्र गायब, देशातून सिलेंडर गायब” अशा तीव्र घोषणांनी परिसर दणाणून सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले असून, हॉटेल व्यवसाय, लहान दुकानदार तसेच विद्यार्थी वर्ग देखील मोठ्या अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत एनएसयुआय पदाधिकारी आक्रमक पवित्रा घेत आहेत.
दि. 20 मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी होणार असून, सरकारने तात्काळ गॅस दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा एनएसयुआय कडून देण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हा ,असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष तेजस कोंडेकर यांनी केले आहे.

