
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
देशात महाराष्ट्र सरकारने गाईला गोमातेचा दर्जा दिला असला तरी गो तस्करी महाराष्ट्रातून अधिक प्रमाणात होत असल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित भव्य हिंदू संमेलनात पाटेश्वर धाम छत्तीसगड येथील संत श्री.राम बालकदास महाराजांनी आशीर्वचन मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
सखल हिंदू समाजाच्या वतीने कोरची येथील हनुमान मंदिर बाजार चौकात 28 फेब्रुवारीला आयोजित हिंदू संमेलनात व्यासपीठावर अध्यक्ष जयदेव कोरेटी होते तर प्रमुख वक्ते म्हणून गजाननजी वायचाळ राज्य संयोजक. आत्मबोध अध्ययन गट खामगाव हे होते. पुढे बोलताना संत श्री बालकदा महाराज म्हणाले की गाईला गोमातेचा देऊन शासनाची जबाबदारी संपलेली नाही तर राज्यातील कसाही खाणे व गो तस्करी रोखण्यासाठी सर्व परिणाम प्रयत्न करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्य सरकारने ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडून गोहत्या होणार नाही त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी यावेळी केली असून अशा हिंदू संमेलनातून शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी बरोबर होत नसेल तर शासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे संत श्री बालकदास महाराजांनी शासनाच्या निर्णयावरती खंत व्यक्त केली
गौरी चौकातील शिव मंदिरातून कलश यात्रेने प्रमुख स्वागत करून संभाजी पाहुण्यांना जय श्रीराम च्या घोषणेत वाजत गाजत स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य देवराव गजभिये यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नंदू गोबाडे यांनी केले हिंदू संमेलना तालुक्यातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.


