नवेगाव :- गडचिरोली येथील नवेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आनंद नगर परिसरात दिनांक २० फेब्रुवारी ला श्वान मृत दिसून आले. व काही वेळातच दुर्गंधी पसरल्याने कुणाल कोवे तालुका प्रमुख शिवसेना (उबाठा) गडचिरोली व परिसरातील काही नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत ला संपर्क साधून श्वान मृत अवस्थेत असल्याची माहिती दिली. सफाई कामगारांची सुट्टी झाल्याने उद्या सकाळी श्वानाचे मृतदेह उचलण्याचे आश्वासन फोनद्वारे ग्रामसेवक यांनी दिले. परंतु आज दिनांक २१ फेब्रुवारी ला त्यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्याने परिसरात प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे.
परिसरात श्वान (कुत्रा) मरण पावल्यास दुर्गंधी पसरणे, माश्या-कीटक आकर्षित होणे आणि आरोग्यास धोका निर्माण होणे असे गंभीर परिणाम दिसून येतात. कुजणाऱ्या मृतदेहामुळे रोगजंतू पसरून परिसरात अस्वच्छता वाढते आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे त्वरीत विल्हेवाट लावणे आवश्यक असते परंतु ग्रामपंचायत कडून अजूनही कोणतेही उपाय योजना न केल्याने परिसरातील नागरिक रोष व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणार काय? असा सवाल शिवसेना उबाठा तालुका प्रमुख कुणाल कोवे यांनी उपस्थित केला आहे.
