श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची. दिनांक 20/2/2026
येथील जिल्हा परिषदेच्या रेस्ट हाऊसची जिर्ण आणि दयनीय अवस्था पाहुन जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलेल्या तिव्र नाराजीला अनुसरून अडीच कोटी रूपयान्च्या नवीन रेस्ट हाऊस बान्धकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.हा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या प्रत्यक्ष दौर्यामुळे आणि ठाम निर्देशामुळे घडला असून स्थानिक विकासासाठी तो महत्वपूर्ण ठरणार आहे.
तालुक्यातील सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने एखादा अधिकारी कोरची तालुक्यात आल्यानंतर, तालुक्यातील समस्या जाणून घेणे, अधिकाऱ्यांना निर्देश देणे, आढावा घेणे, स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करणे,आणि ईतर महत्वाच्या विषयावर चर्चा करणे सोबतच विश्रांती घेणे याकामी तालुक्याच्या ठिकाणी रेस्ट हाऊस ची नितांत गरज होती.
7 जानेवारीला जिल्हाधिकारी कोरचीच्या दौर्यावर आले असता,विद्यमान रेस्ट हाऊसची खराब बान्धकाम गुणवत्ता, स्वच्छतागृहाची खस्ता हालत,अपुरे नळ सन्साधन,आणि एकुणच जिर्ण अवस्था पाहून ते हतबल झाले होते.तिथे उपस्थित पत्रकारांनी तालुका ठिकाणी सर्व सोयीयुक्त रेस्ट हाऊसची मागणी केली होती.यानंतर जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बान्धकाम विभागाच्या अधिकार्याना तात्काळ अन्जाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले.
याकामी प्रारम्भी 50 लाख रूपये सार्वजनिक बान्धकाम विभागाकडे जमा झाले असून उर्वरित 2 कोटी रूपये लवकरच मिळणार आहेत.निवीदा प्रक्रीया आणि ईतर तान्त्रीक औपचारिकता तातडीने केले जात असून लवकरच नवीन रेस्ट हाऊस च्या बान्धकामाला सुरूवात होणार असल्याचे बान्धकाम विभागातील अधिकारी सांगतात.
या रेस्ट हाऊस ची मागणी आम्ही केली होती, त्यामुळे रेस्ट हाऊस मिळाले, असा जावई शोध काही लोकप्रतिनिधी करताना दिसत आहेत. मात्र याचे सम्पुर्ण श्रेय जिल्हाधिकारी यांनाच जाते.
हे नवीन रेस्ट हाऊस कोरची तालुक्यातील अधिकार्यासाठी,दौर्यावर येणाऱ्या व्हीआयपीसाठी,तसेच स्थानिक नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल.जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे कोरची तालुक्याच्या पायाभूत सुविधा विकासाला नवीन गती मिळणार आहे.स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधीनी या मन्जुरीचे स्वागत केले असून, बान्धकाम गुणवत्तापुर्ण आणि वेळेत पुर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
