श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी
कोरची
इथून 2 किमी अन्तरावरील मोहगाव फाट्याजवळ ट्रक्टरला मागच्या बाजूने ट्रकने जबरदस्त धडक दिल्याने एक जन जागीच तर दुसरा दवाखान्यात घेऊन जात असताना मरण पावला. तीन लोक गम्भीर जखमी झाले आहेत.
CG07BA9284 क्रमांकाचे ट्रक, हैद्राबाद वरून रायपूर ला कोरची मार्गे जात असताना, त्याच मार्गे जात असलेला ट्रकटर क्रमांक MH40 B9573 येत असताना कोरची ईथुन 2 किमी अन्तरावरील मोहगाव फाट्यावर ट्रक ने ट्रॅक्टर ला मागून जबरदस्त धडक दिली. धडक एवढी होती की, ट्रॅक्टर पलटी घेऊन 4 मजूर दबले. एक बाहेर फेकल्या गेला. ट्रॅक्टर चा चेन्दामेन्दा झाला.
मृतामध्ये सागर कल्लो 19 वर्षे,रा. झेंडेपार तालुका कोरची,कैलाश कोवे 35 रा. मोहगाव/ वाकडी तालुका कुरखेडा आहेत. गम्भीर छखमी मध्ये राजेश गन्गबोईर 28 रा. चमरोटोला तालुका मोहला ( छ. ग.), पुरूषोतम मडकाम 51 रा. चिचोली तालुका अर्जुनी / मोर जिल्हा गोन्दीया , यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले आहे. तर प्रदीप नैताम हा किरकोळ जखमी असून कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जलसंधारण विभागाच्या वतीने तालुक्यातील झेंडेपार गावाजवळ बन्धार्याचे बान्धकाम सुरु होते. याच कामावर चान्दोना तालुका कुरखेडा ईथून बांधकामासाठी सेन्ट्रीग घेऊन झेंडेपारला ट्रॅक्टर ने जात असताना, हैद्राबाद वरून दगड पाऊडर घेऊन रायपूर ला जात असलेल्या ट्रकने मागून धगक दिली. त्यात ट्रकटर चे इन्जीनचे चारही चाके वरच्या दाशेने गेल्याने त्यात चार मजूर दबल्या गेले, त्यावेळी मोहगाव येथील नागरिक, बेडगाव पोलीस मदत केन्द्राचे प्रभारी पोलीस अधिकारी दिनेश खटोले, व कोरची पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख हे घटनास्थळी धाव घेऊन ट्रकटर च्या खाली दबलेल्या लोकांना कोरचि येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
डोंगरगाव गावच्या फाट्याजवळ अनेक ट्रक चालक थांबून त्या ठिकाणी सर्रास मिळणारी दारू पितात व पुढे कोरची मार्गे छत्तीसगडकडे निघतात डोंगरावर फाट्यावर्ती मुबलक प्रमाणात दारू मिळत असल्याने यामार्गावरून ये-जा करणारे अनेक ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत राहत असल्यामुळे बेडगाव घाटावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अनेकदा अपघात घडले आहे सदर अपघातातील ट्रक चालक अभिशेख शर्मा हा मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवित असल्यामुळे अपघात स्थळावरून पळ काढत असताना, कोरची पोलीसानी त्याला रस्त्यात पकडून अटक केली आहे.
जखमीवर कोरची येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉ. चेतना सिडाम, डॉ. शिव पुंडे यांनी प्राथमिक उपचार केले. पण कोरची येथील ग्रामीण रूग्णालयाची 108 गाडी चन्द्रपूरला दुरूस्तीसाठी गेल्याने, कुरखेडा येथील 108 गाडी बोलावून जखमीना गडचिरोली ला रेफर करण्यात आले.
सदर अपघाताची नोंद कोरची पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून अधिक तपास कोरची पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.
