
श्याम यादव कोरची प्रतीनीधी
येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व एकलव्य निवासी विद्यालय कोरची यांच्या सयुक्त विद्यमाने कोरची येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासीचे प्रेरणास्थान भगवान बिरसामुंडा व वीरागंणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे विद्यीवत पूजन करून कोरची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बहुसंख्येने विद्यार्थी व पालक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. त्यानंतर बहुउदेशीय सभागृहात आदिवासी संस्कृतीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सत्र २०२४-२५ मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्याध्यापक उमाकांत ढोक सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून एकलव्य विद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्रसिंह ठाकूर , हिरालालजी ऊईके शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष भैयालाल कुरसंगे जेष्ठ शिक्षक, दुबे अधिक्षक,सीमा कुरेकार,अधिक्षिका, विद्या कोवे आरोग्य सेविका तथा एकलव्य निवासी विद्यालयाचे आणि आश्रमशाळेतील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित मेश्राम यांनी केले तर आभार राहूल अंधारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शालेय विद्यार्थी समितीचे सदस्यांनी मेहनत घेवून कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् गीताने करण्यात आली:- येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व एकलव्य निवासी विद्यालय कोरची यांच्या सयुक्तविद्यमाने कोरची येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासीचे प्रेरणास्थान भगवान बिरसामुंडा व वीरागंणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे विद्यीवत पूजन करून कोरची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बहुसंख्येने विद्यार्थी व पालक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. त्यानंतर बहुउदेशीय सभागृहात आदिवासी संस्कृतीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सत्र २०२४-२५ मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्याध्यापक उमाकांत ढोक सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून एकलव्य विद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्रसिंह ठाकूर , हिरालालजी ऊईके शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष भैयालाल कुरसंगे जेष्ठ शिक्षक, दुबे अधिक्षक,सीमा कुरेकार,अधिक्षिका, विद्या कोवे आरोग्य सेविका तथा एकलव्य निवासी विद्यालयाचे आणि आश्रमशाळेतील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित मेश्राम यांनी केले तर आभार राहूल अंधारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शालेय विद्यार्थी समितीचे सदस्यांनी मेहनत घेवून कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् गीताने करण्यात आली.

