Oplus_131072

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आजाद समाज पार्टीचा झंझावाती दौरा.
- गडचिरोली जिल्ह्यात विविध गावांमध्ये कार्यक्रम | आदिवासी हक्कांसाठी लढण्याचा निर्धार!
गडचिरोली :-9 ऑगस्ट – आदिवासी संस्कृती व परंपरेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड तसेच सोबत विधानसभा प्रभारी धनराज दामले, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार*, तालूका सचिव विश्वास वाटघुरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये भेट देत विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
▪️पोटेगावमधील सुरुवात — वृक्षारोपण आणि मार्गदर्शन

दौऱ्याची सुरुवात सकाळी 8.30 वाजता पोटेगाव येथील शासकीय आश्रम शाळेत झाली. येथे आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, आदिवासी परंपरा जपण्याचे महत्त्व आणि शिक्षणाचे मूल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर पोटेगाव ग्रामवासीयांसोबत मुख्य चौकात झेंडा फडकाविण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य समाजबांधवांनी उपस्थिती दर्शवली.
▪️जमगावमध्ये चर्चा आणि जनजागृती –
सकाळी 10.30 वाजता *जमगाव* येथे आयोजित आदिवासी दिन कार्यक्रमात विनोद मडावी व राज बन्सोड यांनी पदाधिकाऱ्यांसह हजेरी लावली. या वेळी गावकऱ्यांशी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आसपा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
📍एडानूरची भव्य रॅली –
दुपारी 1 वाजता एडानूर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. गावातील मुख्य मार्गांवर फिरलेल्या या रॅलीत आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीनंतर आदिवासी दिन साजरा करून एकत्रितपणे आदिवासी हक्कांच्या लढ्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. आदिवासीचे शिक्षण, आरोग्य, रोजगार यापासून वंचित राहु नये याकरिता कार्यक्रमात राज बन्सोड व विनोद मडावी यांनी मार्गदर्शन केले.
आदिवासी हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार–
या महत्त्वपूर्ण दिवशी *आजाद समाज पार्टीने* विविध गावांना भेट देत आदिवासी समाजाच्या समस्या मांडल्या, उपायांवर चर्चा केली आणि हक्क व न्याय मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट केला.

