
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चमोर्शी : आमदार धर्मराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली चमोर्शी येथे भव्य जनकल्याण सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून मोठा उत्साह दर्शविला.
या कार्यक्रमात आमदार आत्राम यांनी आपल्या भाषणात जनतेच्या समस्या जाणून घेत विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “आमच्या सरकारचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचविण्याचा आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आणि रोजगार या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.”
सभेत विविध योजनांचा आढावा घेऊन नव्या प्रकल्पांची घोषणाही करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले प्रश्न मांडले असता आमदारांनी त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते व महिला स्वयंसहायता गटातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
हजारोंच्या जनसमुदायासमोर आ. डॉ. धर्मरावबाबांनी फुंकले निवडणूकीचे रणशिंग
महायुतीतील घटक पक्ष सोबत आले तर ठिक, अन्यथा ‘एकला चलो रे’ चा दिला नारा जनकल्याण यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेच्या समस्या मार्गी लावणार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहायचे असून यावेळी जिल्ह्यातील नगरपालिका व जिल्हापरिषद यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन माजी मंत्री आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी हजारो जनसमुदायासमोर केले. सर्वांगिण विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेली ‘जनकल्याण यात्रा’ ही एक सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाच्यावतीने चामोर्शी येथील आठवडी बाजार परीसरातील नगरपंचायतीच्या प्रांगणात आज १२ ऑक्टोबर रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आ. अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम,
जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, नाना नाकाडे, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, प्रदेश संघटक सचिव लौकिक भिवापुरे, लिलाधर भरडकर, नगरसेवक राहुल नैताम, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, व्यंकटी बुरले, डॉ. हेमंत भाकरे, प्रणय बुरले, डॉ. नोमेश जुवारे, डॉ. अतुल सुरजागडे, अॅड. डिम्पल उंदिरवाडे, रिंकु पापडकर, अॅड. श्रिकांत सुरजागडे, विधानसभा अध्यक्ष नेमाजी घोगरे, महिला तालुकाध्यक्षा रुपाली दुधबावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते
आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम पुढे म्हणाले ‘ही यात्रा म्हणजे निव्वळ राजकीय प्रचार नसून लोकांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. आमचे ध्येय हे विकासाभिमुख असून, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे ही आमची जबाबदारी आहे असेही आ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केलेतर संचालन करून आभार रजनी पाल यांनी मानले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामध्ये
अमृता खानविलकर यांनी उपस्थितांची जिंकली मने
मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरली ती मराठमोळी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर. त्यांनी आपल्या दिलखुलास भाषणाने व उपस्थितीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

