
सोनू वाळके, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
गडचिरोली :- गडचिरोली काटली गावाजवळ मॉर्निंग वॉक ला गेलेले 6 मित्राला भरदाव वाहनाने चिरडले,त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोंघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून बाकी दोघांना हेलिकॉप्टर ने नागपूर ला हलविण्यात आले. अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते व वाहूतुक कोंडी निर्माण झाली होती.
आज सकाळी पहाटे रोजप्रमाणे काटलीचे सहा मित्र नाल्याजवळ मॉर्निंग वाक करण्यासाठी गेले असता आरमोरी वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या भरदाव गाडीने सहा मित्रांना उडवले,त्यात पिंकू नामदेव भोयर,वय 14 वर्षे, काटली, तन्मय बालाजी मानकर,वय 16 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला,दिशांत दुर्याधन मेश्राम, तुषार राजेंद्र मारबत यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित केले,बाकी दोघांना हेलिकॉप्टर ने गडचिरोली वरून नागपूर हलविण्यात आले त्यात क्षितिज तुळशीदास मेश्राम, आदित्य कोहपते हे दोघे गंभीर जखमी आहेत,

पोलिसांना माहिती मिडताच घटनास्थळी पोहचले ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य व पुढील तपास सुरू आहे.

