
श्याम यादव,प्रतिनिधी कोरची
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव येथे पालक सभा आयोजित करून शाळा व्यवस्थापन समिती,सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती,
विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा वीकसन समिती चे गठन करण्यात आले. यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदी श्रीमती रिनाताई सलामे, उपाध्यक्ष श्री. दिनेश तांडेकर यांची निवड करण्यात आली. तसेच इतर समित्या मध्ये चेतन किरसाण सरपंच यांची विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे अध्यक्ष पदी तर श्री. बापूजी उईके बाल विकास तज्ञ, रसिका धानगाये, कविता गुरवेले, लीलाबाई ताडामी, जितेंद्र वाळदे, अंकालू बघवा, भाऊराव वाळदे व इतर पालक सदस्य यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी प्राचार्य सी. आर .धारणे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष प्रतिभा प्रधान, राकेश पारडवार तमूस अध्यक्ष,ज्येष्ठ शिक्षक एस.बी. उसेंडी, गणेश सोनकलंगी , प्रमोद रामटेके मनोज बनसोड, राकेश गायकवाड,काजल मडावी,विद्या उंबरकर , नेहा निमजे , जिजा खुणे, शिला नैताम यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

