Two school buses collide near Max Hospital on Koradi Road, causing a serious accident


नागपूर Nagpur
नागपूर येथे कोराडी रोडवर मॅक्स हॉस्पिटलजवळ भवन्स कोराडी स्कूल VAN आणि नारायणा शाळेतील स्कूल बसची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात झाला, असून यात शाळकरी मुले जखमी झाली असून अपघातस्थळी निरागस लहान मुलांनी घाबरून किंकाळ्या फोडल्याने संतप्त जमाव रस्त्यावरच बसले, जखमींपैकी भवन्स येथे नवव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. सान्वी खोब्रागडे Sanvi Khobragade वय – १ ५ व चालक रितिक कनोजिया Ritik Kanojiya वय २ ४ यांचे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे कळले आहे. सान्वी चा लहान भाऊ विराज वय ९ हा गंभीर जखमी झाला आहे , अपघातामुळे विद्यार्थ्यांना जखमी अवस्थेत जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली. काही पालकांना मुलांना पाहून आक्रोश फुटला. नारायण शाळेच्या बसमध्ये विधार्थी नसल्याचे कळले आहे . Two school buses collide near Max Hospital on Koradi Road, causing a serious accident
कोराडी रोडवरील सुरू असलेल्या संथ आणि हलगर्जी तसेच कामात दिरंगाई आणि वाहतुकीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते असल्यामुळे परिसरात अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असून प्रशासन मात्र नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.नागरिकांनी रस्त्याच्या कामातील बेफिकिरीबद्दल संताप व्यक्त करत काम करणाऱ्या खासगी कंपनीविरोधात अपघातानंतर घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी करीत ‘ओरिएन्ट कंपनी’ Orient Company मुर्दाबाद’च्या घोषणा देत संतप्त जमाव रस्त्यावर बसल्यामुळे तणाव निर्माण होऊन घटनेमुळे बरीच मोठी गर्दी जमल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. संतापलेल्या नागरिकांनी झालेल्या अपघातास कारणीभूतांवर कारवाईची मागणी केली आहे. newsjagar

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जमाव पांगवण्यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला.
योगेश रामचंद्र पाथरे, राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय शिक्षक पालक संघटन यांचा संतप्त सवाल
या अपघातासाठी जवाबदार कोण?
शाळा मालक, बस/VAN चालक, पालक की बालक?
भवन्स आष्टी शाळेच्या आवारात ९ वर्षीय बालकाचा मृत्यू असो, सरस्वती शाळा स्कूल बस अपघात असो, भवन्स कोराडी स्कूल VAN चा अपघात असो., दरवेळी बालक आणि पालक यांनाच त्रास होतो. दुर्दैवाने कुठलीच कारवाई स्थानिक प्रशासन करत नाही. यावेळी या गंभीर विषयावर वैयक्तिकरित्या महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष दिले पाहिजे जेणेकरून बालकांना आणि पालकांना न्याय मिळेल.
योगेश रामचंद्र पाथरे, राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय शिक्षक पालक संघटन, भारत

