महिला बचतगट कर्ज वितरण कार्यक्रम
सावली🙁योगेश रामटेके)
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्तितीत
आज दि.08/09/2025 ला सावली शाखेत महिला बचतगट कर्ज वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला; सदर कार्यक्रमात दोन बचत गटांना रक्कम 500,000 ( पाच लक्ष ) रुपये वाटप करण्यात आले.
त्या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक सन्मानीय *श्री.रोहीतभाऊ बोम्मावार* , श्री सतिशभाऊ बोम्मावार, श्री छत्रपती गेडाम व शाखाधिकारी मा. एन डी घोनमोडे शाखचे निरीक्षक पाडेवार व सर्व कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.
सन्मानीय संचालक रोहीतभाऊ बोम्मावार यांनी मेळाव्याला संबोधित करताना महिलांच्या आर्थिक मदतीकरिता व शेतकऱ्यांच्या हितासाठी सेवा देण्यास बँक तत्पर आहे, तसेच काही अडचण आल्यास शाखाधिकारी व माझ्यासोबत वैयक्तिक संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
