
जमिनीवर योग व आयुर्वेद हॉस्पिटल बांधण्याचा घाट;
बुलढाणा – लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी बांधवांचे गेल्या ५० ते ६० वर्षांपासून अतिक्रमण आहे. तसे पुरावे सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. जमिन पडीत असल्याचा शासनाला अहवाल दिला आहे.
हा चुकीचा अहवाल दिल्यामुळे शासनाने या ठिकाणी योग व आयुर्वेद हॉस्पिटल करण्याचे प्रस्तावित केले आहे. याला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावरच बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील जमिनीबाबत १९९० च्या अगोदरच्या दंडाच्या पावत्या व शासनाकडे भाडेपट्टा मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याचे पुरावे सुद्धा आहेत. परंतु शासनाने नेमलेल्या महसूल प्रतिनिधींच्या हुकूमशाही मुळे शेतकऱ्याला आज शेतीच्या सातबारा पासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या ५० वर्षापासून वहीती करीत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये शासनाने योग व आयुर्वेद हॉस्पिटल आणण्याचा घाट घातला आहे.

जमीन पडीत असल्याचा अहवाल
या ठिकाणी हॉस्पिटल होण्यासाठी अतिक्रमित शेतकऱ्याचा विरोध असून स्थानिक महसूल कर्मचारी, अधिकारी यांनी सुपीक तसेच वहिती असलेली जमिन पडीत असल्याचा शासनाला अहवाल दिला आहे. चुकीचा अहवाल दिल्यामुळे शासनाने या ठिकाणी योग व आयुर्वेद हॉस्पिटल करण्याचे प्रस्तावित केले आहे. याला शेतकऱ्यांमधून कडाडून विरोध केला जात असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. या विरोधात उपोषण सुरु केले आहे.
त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
दरम्यान चुकीचा अहवाल देणाऱ्या कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फाची कारवाई करण्यात यावी. तसेच शासनाच्या नियमानुसार सन १९९० च्या अगोदर असलेल्या दंडाच्या पावत्या ग्राह्य धरून, नियमाकुल करून, भाडेपट्टे, सातबाराला फेर घेऊन नोंद करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच उपोषण सुरू केले आहे.

