
– बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्क ची मागणी
गडचिरोली – बुध्दिष्ट इंटरनेशनल नेटवर्क , भारत मुक्ती मोर्चा व आरपिआय च्या वतीने बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधिन करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. हे आंदोलन चरणबद्ध असून दुसऱ्या चरणात १७ सप्टे. ला धरणे आंदोलन व तिसऱ्या चरणात १ आक्टो . ला रॅली प्रदर्शन भारतभर करण्यात येणार आहे .
या निवेदनात विविध मागण्या आहेत . नागपूरची दिक्षाभूमी ही ॲकेडमीक शिक्षण केंद्र न करता धम्म शिक्षण केंद्र करण्यात यावे. तेथे एक हजार भिक्खूंचे प्रशिक्षण केंद्र बनवावे . देशा विदेशातून येणाऱ्या अनुयायां साठी भव्य विश्वानगृह तयार करण्यात यावे . दिक्षाभूमिचे सौदर्यीकरण करण्यात यावे . ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यात यावे . ओबीसींची त्यांचबरोबर सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावे . प्रत्येक जातींना पर्याप्त आरक्षण देण्यात यावे . आदिवासींचे विस्थापन थांबवावे . हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणे लावणे थांबवावे .
निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , आरपिआय चे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर , राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी प्रमोद राऊत, आरपिआय चे उपाध्यक्ष दशरथ साखरे, सहसचिव मारोती भैसारे, प्रेमदास रामटेके , दामोधर शेंडे , आदिवासी संघटनेचे उमेश उईके , डोमाजी गेडाम, नरेंद्र शेंडे, जीवन मेश्राम , विद्या दुग्गा , तनुजा कुमरे , आरती कोल्हे , आरती कंगाले, शामला घोडाम , वनिता ताराम तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

