
खाजगी स्विय सहायक स्व. तुषार सातपुते यांच्या दोन्ही मुलाचा माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी उचलला शिक्षणाचा खर्च व कुटुंबीयांना केली आर्थिक मदत
चामोर्शी – भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या सोबत विस वर्ष सावलीप्रमाणे असणारा व त्यांच्या समाजमाध्यमाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या खाजगी स्वीय सहायक तुषार सातपुते यांचा दिनांक एक सप्टेंबर सोमवारी भेंडाळा हरणघाट मार्गांवर दुचाकीचा अपघात झाला डोक्याला जबर मार लागल्याने नागपुर येथील एम्स रुग्णालयात उचारादरम्यान दोन सप्टेंबर मंगळवारी दुःखद निधन झाले. बुधवारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
तुषार हा मनमिळावू, शांत व संयमी म्हणुन परिचित होता. त्याच्या पाठीमागे पत्नी दीक्षा, चार वर्षाचा मुलगा शिवांश व दिड वर्षाचा मुलगा भार्गव आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे.त्याच्या अशा आकस्मिक अपघाती निधनाने तूषारच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी खंडाळा या गावी त्याच्या राहत्या घरी चार सप्टेंबर गुरुवारी भेट दिली. शिवांश व भार्गव या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला व पत्नी दिक्षाला रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली व कुटुंबीयांना आर्थिक मदतही केली. यावेळी ते भावूक झालेले पहावयास मिळाले.
तुषार हा सावलीप्रमाणे सुखदुःखाच्या काळात माझ्यासोबत होता तो माझ्या कुटुंबाचा एक सदस्यच होता. असा विश्वासू साथीदार अचानक सोडून जाण्याने कुटुंबीयांसोबत माझीही अपरिमित हानी झाली. अशी भावना व्यक्त केली त्यामुळे तुषारच्या कुटुंबियांच्या मागे सुखदुःखात मी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास देत त्यांनी तुषारच्या कुटुंबीयाला धिर दिला. व दुःखातून तुषारच्या कुटुंबीयाला सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना केली.
या प्रसंगी तुषारची पत्नी दीक्षा, त्याची दोन मुले शिवांश, भार्गव, वडील पुरुषोत्तम सातपुते, आई लताबाई तसेच कुटुंबीय व आप्तस्वकीय उपस्थीत होते.

