Chandrapur News : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक भांडणावरून विसापूरात एका इसमाची हत्या झाली. या घटनेची शाई वाळत ही तोच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचा चंद्रपूरात शिवसेना (Uddhav Balasaheb Thakarey Gat) Shahar Pramukh शहर प्रमुख शिवा मिलिंद वझलकर (Shiva Milind Vajhalkar) (25) रा. अरविंद नगर चंद्रपूर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास छत्रपती नगरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस परिसरातील स्वप्निल काशीकर यांच्या कार्यालयासमोर घडली.
अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
या घटनेनंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे मात्र कुणीही आत्मसमर्पण केले नसून काही जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी दिली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल काशीकर यांच्या कार्यालय परिसरात शिवा यांना बोलाविण्यात आले होते. त्यांचा त्याठिकाणी शाब्दिक वाद झाला. या वादातून शिवा यांनी आरोपीच्या कानशिलात लगावली. यानंतर आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपी तेथून पसार झाला. शिवा हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच गतप्राण झालेत.
घटनेची वार्ता परिसरात पसरताच संतप्त नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून शिवा यांचा मृतदेह लगतच्या रुग्णालयात हलविला. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह हलविला. घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेत कोणाचा हात आहे. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. चंद्रपूरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.