
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी :-
गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी तहसील व नगरपंचायत चामोर्शी म्हणून ओळखल्या जाते. नगरविकास विभागाकडून विकास कामाकरिता निधी मिळुनही विकास जसा व्हायला पाहिजे तसा विकास अजून पर्यंत झाला नाही, विकास खुंटत आहे, नगरपंचायतमध्ये अनेक खुर्ची सम्राट नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती विराजमान झाले त्यांनी खुर्ची ची शोभा वाढवली परंतु खुर्चीला न्याय दिला नाही म्हणून विकासाची परंपरा जैसे थे आहे. कुठेतरी विकास खुंठत असल्याचे चित्र दिसत आहे. बस स्थानकावर बाथरूम ची सोय नाही निवेदन देऊन सुद्धा पर्यायी व्यवस्था नाही, शाळेच्या मुला-मुलींना व प्रवासी यांना या गोष्टीचा खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे,

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतरण होऊन खूप वर्षाचा कालावधी लोटला अनेक अधिकारी/ पदाधिकारी आले गेले परंतु मात्र चामोर्शी शहरातील अनेक समस्या आजही कायम आहेत. नगरपंचायतीमध्ये १७ प्रभाग आहेत. या सर्वच ठिकाणी रस्ते, गटार, कचरा, अपूर्ण कामे, श्वानांचा उपद्रव, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग अशा समस्या आहेत. विकास म्हणून पक्के रस्ते नाही, नाल्या बांधकाम नाही, स्ट्रीट लाइट ची पाहिजे तशी सुविधा नाही, रात्री लोकांना फिरतांना अंधारातून जावं लागते, पावसाळ्यात नालीचे बांधकाम कुठे अर्धवट असल्यामुळे नाली तुडूंब भरून राहून त्यात डासांचे प्रमाण व घाणीचे साम्राज्य निर्माण होत त्यामुळे डेंगू, मलेरिया सारखे आजार फोफावत आहे, तरी नगरसेवकांचे लक्ष्य नाही, केंद्र शाळा ते जुना तहसील रोड हा पक्का सिमेंट बांधकाम असून फक्त राजमाता आश्रम शाळा इथपर्यंत कांम झालेले आहे तिथून तर जुना तहसील रोड खड्डेमय होऊन पाण्याने तुडुंब भरून गेले आहे, हा आश्रम शाळेपासून रस्ता अजून पर्यंत बनला नसून लोकांना, शाळेतील मुला मुलींना ये जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र यातील अनेक रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाहीत, तर काही ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नगरपंचायत होऊनदेखील समस्या सोडवता येत नसतील तर पूर्वीची ग्रामपंचायतच बरी होती, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
गटारांची दुरावस्था:–
रस्त्यांचे काँक्रीटीकरण करताना ठेकेदाराकडून गटाराचेही काम होणे अपेक्षित होते, मात्र ती कामे झालेली नाहीत त्यामुळे त्यांची दुरावस्था झाली आहे. सांडपाण्याचे प्रवाह योग्य प्रकारे होत नसल्याने गटारे तुडूंब भरून जात असल्याने काही ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी येत असल्याने नागरिक त्रस्त होत आहेत.तरी नगरपंचायतीने सदर बाबीचा विचार करून समस्येचे निराकरण करावे अशी सर्व सामान्य नागरिकांचा आर्त हाक आहे.
नगरपंचायत च्या प्रभारी असलेले CO श्री .पिदूरकर साहेब यांचेशी आमच्या प्रतिनिधी ने संपर्क केला असता मला त्या रस्त्याबाबत काही माहिती नाही, मी चार्जवर आहे असे म्हणून उडवाउडवीचे उत्तर दिल्या गेले .

