
भाजपाचे आमदार बंटी बांगडिया यांनी घेतली माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट.

निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक बाबींवर विचारविनिमय.
अमोल, मारकवार |तालुका प्रतिनिधी

अहेरी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, भाजपचे आमदार श्री. बंटी बांगडिया यांनी अहेरी येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. येत्या २३ तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाची संघटनात्मक तयारी, पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि निवडणुकीच्या विविध पैलूंवर यावेळी विचारविनिमय झाल्याचे समजते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीवेळी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी उपस्थित होते. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या या भेटीमुळे निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक समन्वयाच्या दृष्टीने अहेरीतील राजकीय घडामोडींना महत्त्व आले आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही सुशिक्षित मतदारांच्या प्रश्नांशी संबंधित असल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि संघटनात्मक पातळीवर समन्वय राखणे या बाबींना महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांमधील चर्चा आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.

