
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : येथील निशिगंधा इंग्लिश स्कूल चामोर्शीच्या चार विद्यार्थ्यांनी नवोदय तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवल्याबद्दल शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवोदय परीक्षेमध्ये जिल्ह्यातून प्रथम आलेला अर्णव बंडू बारसागडे व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रवीण प्राप्त करणारे वर्ग सातवी चे कपिस मोरेश्वर कुनघाडकर, आर्या अवधूत चलाख तर वर्ग चौथीचा रेहान राजेश बोदलकर अशा या चार विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन गडचिरोलीच्या सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला.

निशिगंधा इंग्लिश स्कूल ने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विविध स्पर्धा व शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षांसाठी सातत्याने मार्गदर्शन केले असून विद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे .
शाळेच्या प्राचार्य संचालिका वालदे यांनी मुलांच्या यशाचा अभिमान बाळगत , आपली शाळा असेच विद्यार्थी घडवणार असे सांगितले. तसेच
या यशाबद्दल राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे , सचिव विवेक सहारे , से. नि. शिक्षणाधिकारी माणिक साखरे व मंडळाचे पदाधिकारी तथा विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

