
गडचिरोलीः नालंदा अकॅडमी वर्धाच्या वतीने ‘उच्च शिक्षण संवाद’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे 13 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
नालंदा अकॅडमची संस्थापक व प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ अनुपकुमार हे ‘मुलांच्या भविष्यासाठी नवी दिशा, उच्च शिक्षणाच्या संधी आणि समाजाची भूमिका’ या विषयावर महत्वपूर्ण संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, सामाजिक कार्यकर्ते श्याम रामटेके, आदिवासी युवा नेते विनोद मडावी, सामाजिक कार्यकर्ते भीमराव जुनघरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेला पालक, विद्यार्थी, शिक्षक, बुध्दीजीवी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नालंदा अकॅडमीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

