
गडचिरोलीत १३ सप्टेंबरला भव्य आयोजन; प्रसिद्ध प्रेरणादायी युवा वक्ते डॉ. विनोद बाबर साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा मिळावी, स्पर्धा परीक्षांसह करिअरच्या विविध संधींची माहिती व्हावी आणि युवकांमध्ये ध्येय निश्चितीची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने ॶॅड. दुष्यंत किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ‘करिअर मार्गदर्शन सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

हा विशेष कार्यक्रम रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, आर. के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे होणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध प्रेरणादायी युवा वक्ते व शिवचरित्र अभ्यासक मा. प्रा. डॉ. विनोद बाबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षा, शिक्षण, करिअरसाठी योग्य निवड तसेच यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर ते मार्गदर्शन करणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
“संकटं कितीही वाटेला येतात, ज्यांची ध्येयं ती त्यांच्याशी वाटचाल करतात” या प्रेरणादायी विचारातून युवकांना नव्या उमेदीने ध्येयाकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
या सोहळ्याचा लाभ तमाम पालक, विद्यार्थी तसेच युवा मित्र-मैत्रिणींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजक ॶॅड.दुष्यंत नामदेव किरसान मित्र परिवार, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
एक कार्यक्रम… अनेक संधी… आणि यशस्वी भविष्यासाठी नवी दिशा!गडचिरोलीतील विद्यार्थी-युवकांसाठी हा करिअर मार्गदर्शन सोहळा निश्चितच प्रेरणादायी पर्व ठरणार आहे.

