
चामोर्शी तालुक्यातील,शेतकरी नागरिकांच्या मागणी नंतर. आमदार डॉ .मिलिंद नरोटे, यांच्या निर्देशानुसार,कन्नमवार जलाशयाचे पाणी,धान रोवणी करिता, जलपूजन करून, सोडण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार डॉ.मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा क्षेत्र.
चामोर्शी/भेंडाळा:

रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील स्थानिक रेगडी येथील (दिना धरण ) कन्नमवार जलाशयाचे पाणी, येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनंतर गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निर्देशानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या रोवण्या पूर्ण करण्यासाठी सोडण्यात आले,
यामुळे चामोशी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक दिवसापासून पाण्याने दडी मारल्याने शेतात पाणी नसल्यामुळे या भागातील रोवणी पूर्णपणे बंद झाले होते, शेतकरी नागरिक कसेबसे मोटर पंप लावून शेतातील रोवणी करीत होते व वारंवार पाणी सोडण्या बाबत मागणी होती या विषयाची दखल घेऊन आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी दीना धरण, कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडण्याचे निर्देश दिले व मुंबई हुन भ्रमणध्वनी वर बोलतांना मतदार संघातील समस्त शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले,व आज भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली व चामोर्शी मंडळ पदाधिकारी व घोट सुभाष ग्राम मंडळ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घोट मार्गा वरील गोलाबाई देवस्थान येथे पूजन करून स्थानिक अभियंता विकास दूधबळे, उपअभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्नमवार जलाशय येथील पाण्याचे विधिवत पूजन करून जलाशयाचे पाणी सोडण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेश अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, माजी जि, प, सदस्य नामदेव सोनटक्के, घोट येथील सरपंच रूपाली दूधबळे,
यांच्या उपस्थितीत घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार,चामोर्शी मंडळ अध्यक्ष रोशनीताई वरघंटे, महामंत्री संजय खेडेकर, विकास मैत्र,सौ कविता किरमे,विलास उईके, राजेश्वर चूधरी, नीरज रामानुजनवार,नरेश अलसावार, श्रावण सोनटक्के, माणिक कोहळे,प्रशांत पालारपवार, विनोद किरमे, रोहिदास धोटे,संतोष दुधबळे, आनंदराव सातपुते, सुमेन विश्वास, पलाश घरामी, महेश विश्वास, पोपट आभारे, सोम वैद्य, उपसरपंच मीहीर विश्वास,महेश विस्वास,सुकंठ रॉय,प्रकाश सातपुते,व राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

