
अमित कत्तीवार विशेष जिल्हा प्रतिनिधी
वडसा (गडचिरोली): पेपरफुटी प्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार श्री रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी उपस्थिती दर्शविली.आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी सभापती परसरामजी टिकले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले (देसाईगंज), मिलिंद खोब्रागडे (आरमोरी), मनोज अग्रवाल (कोरची), मनोज ढोरे, शालुताई दंडवते, धनपाल मिसार, जयमाला पेंदाम, विकास प्रधान, आरती लहरी, नितीन राऊत, श्याम उईके, दिलीप घोडम, मनोहर निमजे, सागर वाढई, ऋषी बगमारे, टोमेश्वर बगमारे, अक्षय बागडे, नंदू चावला, हंसराज लांडगे, कैलास वानखेडे, आक्रोश शेंडे, परशुराम ठाकरे, अमर भर्रे, साजन मेश्राम, संजय करानकर, मेघराज बुराडे, सुरेश तोडफोड, आशा दहिवले, रूपलता बोदेले, वैष्णवी आकरे, होमराज हारगुडे, आनंदशिंग चावला, प्रशांत अंकमवार, भास्कर कन्नाके, व्यंकट पेंदाम, योगेश नेवारे, श्रीरसागर शेंडे, प्रमोद मेश्राम, सागर बनसोड, श्रीकांत सूर्यवंशी, अंगराज बुद्धे, डोमाजी दिवठे, लुनकरण चौधरी, कमलेश बारस्कर, जावेद कुरेशी, ताजूल उके, दुर्वास नाईक, अनिल कोठारे, संजय कोसरे, विलास बुराडे, शैलेश बगमारे, जितेंद्र चौधरी, गजानन घरत, चारुदत्त राऊत, राहुल खरकाटे, धर्मेंद्र लाडे, कुंदन बोदेले, देवानंद सहारे, पराग लांजेवार, संकेत रामटेके, निलेश दुपारे, अथर्व राणे, देवनाथ सयाम, विशाल मेंढे, योगेश ढोरे, रुपेश टिकले, शैलेश येलगधवार, रमेश चौधरी, विशाल मसराम, मिथुन मेश्राम, गजू नाईक, राजकुमार मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करत शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

