
शेतकरी संघर्ष समितीची बैठक संपन्न; जमीन अधिग्रहणाच्या विषयाला घेऊन दिल्ली गाठणार
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.१७ जूलै : गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या विमानतळ, एमआयडीसी व इतर प्रकल्पांकरिता मोठ्या प्रमाणात सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून, भविष्यात त्यांच्यावर उपासमारीची वेळसुद्धा येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी अधिग्रहित न करता इतर पर्यायी जागेचा विचार करून विकासात्मक प्रकल्प राबवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने, मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतेच मुंबई गाठून राज्यपाल महोदयांसह विधिमंडळातील आमदार यांच्या भेटी घेऊन जमीन अधिग्रहित करू नये, अशी मागणी केली.
आता शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली गाठून राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच इतर नेतेमंडळी व खासदारांची भेट घेणार असून, त्या माध्यमातूनही सदर जमीन अधिग्रहित करू नये, हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार आहेत. या अनुषंगाने शेतकरी संघर्ष कृती समितीची बैठक महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह शेतकरी दिवाकर निसार, प्रमोद भगत, अनिल कोठारे, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, ढिवरू मेश्राम, विजय लाड, विलास चिचघरे,यादव गोमस्कर, मारुती कांबळे, स्वप्नील निकुरे, उत्तम ठाकरे, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, विकास जंठे, रवींद्र बोधलकर, श्रीनिवास ताडपल्लीवार, जीवन निकुरे, मारुती निकुरे, लीलाधर गुरनुले, वासुदेव गेडाम, देवानंद कुंबरे, विकास गेडाम, मनसराम, सूरज देशमुख, मारुती मेश्राम, कडू भोयर, नरेंद्र कोठारे, कालिदास पेंदाम, विलास मोहरले, नीलकंठ सातपुते, खुशाल खेडेकर, परसराम मांडवे, विलास मांडाळे, नंदू मेश्राम, उमाजी कन्नाके, पांडुरंग गुरनुले, जीवन अडिंगवार, रमेश तुंबळे, रामभाऊ बोधलकर, राजेंद्र सातपुते, विनोद मेश्राम, रामकृष्ण कड, संजय कुसे, सुरेश ढोमणे, धर्मराव आत्राम, दीपक ढुमणे, देवराव आत्राम, सुधाकर हजारे, संजय वडपल्लीवार, वसंत परसोडे, एकनाथ टीमाडे, गिरीश भोयर, गंधेव कोपरे, प्रल्हाद रायपुरे, अमित कोहपरे, मोरेश्वर गुडपल्ले, विकास डोके, दीपक वाकुडकर, रोशन कुंबरे, रमेश पिंपळकर, नुमचंद्र पी. भिवणकर, होनाजी हुलके, सोमेश्वर झाडे, विकास चौधरी, लंकेश गेडाम, श्रीरंग मशागतरी, नोमाजी सातपुते, रमेश तुंकलवार, भगवान तुंकलवार, मोहन तुंकलवार, मधुकर तुंकलवार, खुशाल चिंटुलवार, चांगदेव तुंकलवार, प्रफुल सुधीरवार, देवराव तुंकलवार, मनोज माधववार, पुरुषोत्तम तुंकलवार, बंडू हुलगे, भक्त दास भगत, भारत वाकुडकर, निकेश तुंकलवार, सुरज देशमुख, मोहन पेंदाम, अनिल सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

