
संघटन बळकटीसाठी पक्षाने सोपविली महत्त्वाची जबाबदारी
गडचिरोली | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते तथा समाजवादी पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले इलियास खान मोहम्मद खान पठाण यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ही नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेवराव किरसान, आमदार रामदास मसराम तसेच गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
दि. १६ जुलै २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी इलियास खान पठाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पक्ष संघटनेतील ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली.
नियुक्तीप्रसंगी पक्ष नेतृत्वाने इलियास खान यांनी काँग्रेसची पुरोगामी विचारसरणी, संविधानिक मूल्ये आणि लोकहिताची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावी, तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षविस्तार, जनसंपर्क आणि जनआंदोलनांमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, असा विश्वास व्यक्त केला.
या नियुक्तीचे विविध राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परसराम टिकले, राजेंद्र बुल्ले, जीवन पाटील नाट, मनोज अग्रवाल, मिलिंद खोब्रागडे, शालू दंडवते, विकास प्रधान, राजू रासेकर, नितीन राऊत, धनपाल मिसार, शाम उईके, आक्रोश शेंडे, हंसराज लांडगे, वैष्णवी आकरे, ममता पेंदाम, प्रकाश सांगोळे, दिलीप घोडाम, अरुण कुंभलवार, उस्मान खान, सिराज खान, कमलेश बारस्कर, सागर वाढई, राधेश्याम पत्रे, कैलास वानखेडे, परशुराम ठाकरे, नरेंद्र गजपुरे, मनोज ढोरे, फैझान पटेल, इम्रान शेख, सादिक शेख, डोमाजी दिवटे, लतीफ रिझवी, मुजीब शेख, वहिद शेख, राणी ताई, हाजरा शेख, मुन्ना शेख, खलील खान, जब्बार शेख, रियाजूल शब्बीर, कैलाश बगमारे, प्रशांत अंकमवार, अझीम शेख, शकील शेख, अमोल बुराडे यांच्यासह अनेकांनी इलियास खान पठाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

