
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली (गडचिरोली) : गडचिरोली –चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका महिला काँग्रेस कमिटी, एटापल्ली यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. एटापल्ली येथील कस्तूरबा गांधी विद्यालयात विद्यार्थिनींना नोटबुकचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थिनींनी तसेच शाळा प्रशासनाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. ताराताई लोकनाथ गावडे, बेबी हेडो, जयश्री खोब्रागडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुळमेथे मॅडम, शिक्षिका शिशिका मॅडम तसेच तालुका महिला काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

