
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.१३ जूलै:गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेवजी कीरसान यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा क्षेत्रात विविध सामाजिक व जनहिताचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ९.०० वाजता रामनगर येथील जवाहर नेहरू उच्च प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरणाने होणार असून या उपक्रमाचे आयोजन शहर काँग्रेस कमिटी, गडचिरोली यांनी केले आहे.

त्यानंतर सकाळी १०.०० वाजता गोकुळनगर येथील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात येणार असून हा उपक्रम तालुका काँग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग), गडचिरोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ११.०० वाजता जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली येथे रुग्णांना फळवाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस कमिटी, गडचिरोली यांनी केले आहे.
यानंतर दुपारी १२.०० वाजता त्याच ठिकाणी ‘मदतीचा घास’ या उपक्रमांतर्गत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
याशिवाय गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुके व विविध गावांमध्येही सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून सामाजिक कार्याला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

