
आ.डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे मार्गदर्शन; संघटन बळकटीसह विकासाच्या विविध विषयांवर चर्चा
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि.५ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली जिल्हाच्या वतीने आगामी १३ जुलै रोजी गडचिरोली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडणार असून, जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या मेळाव्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती, शेतकरी व शेतमजुरांसाठीच्या योजना, बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, महिलांसाठी विशेष योजना, आदिवासी व भूमिहीन नागरिकांसाठी उपलब्ध शासकीय सुविधा, तसेच उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक विस्तारासाठी प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविणे, आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीची दिशा निश्चित करणे आणि जिल्ह्यातील विकासकामांवर सखोल चर्चा करणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम १३ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी दुपारी १.०० वाजता, अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“संघटन मजबूत – जनतेचा विश्वास दृढ – विकासाचा नवा संकल्प” या घोषवाक्यासह आयोजित हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

